आज महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समित्या व २८,००३ ग्रामपंचायती आहेत. यामध्ये २,२३,८५३ ग्रामपंचायत सदस्य असून त्यातून १,११,९२७ महिला या ग्रामपंचायतीतील सदस्या आहेत. अनुसूचित जातीचे २४,६२४ व अनुसूचित जमातीचे २६,८६३ सदस्य प्रतिनिधित्व करत आहेत. महाराष्ट्रात २,८३५ ग्रामपंचायती आदिवासी आहेत.