पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक नवीन किल्ले बांधले, बांधलेल्या किल्ल्यांचीच डागडुजी केली. मात्र ह्यावेळी यूरोपीय वसाहतवाद्यांनी भारताच्या भूमीवर पाय रोवले होते. त्यांनी स्वसंरक्षणासाठी फोर्ट विल्यम, फोर्ट सेंट जॉर्ज, फोर्ट सेंट डेव्हिड, आग्वाद त्रांकेबार वगैरे किल्ले बांधले.