ओपर्ट यांच्या मते मल्ल आणि मार एकच, त्यापासून मार-म्हार-महार असे लोकवाचक नाव होत. त्यावरून मल्लाच - महारांचे गाव ते महाराष्ट्र हे देशनाम तयार झाले. “महाराष्ट्रात नागवंशाच्या महारगणांच्या लोकांनी प्राचीन काळात मोठ्या संख्येने येऊन विभिन्न भागात वसाहती प्रस्थापित केल्या होत्या.