महासागराच्या शेजारी वाळवंट असू शकते का?
✅ Updated recently
वाळवंट एका ठिकाणी संपते आणि तिथूनच महासागर सुरू होतो. नामिबियाचे हे वाळवंट अन्यही अनेक कारणांसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरलेले आहे. हे ठिकाण असे आहे जिथे जणू काही अटलांटिक महासागर स्वतःच वाळवंटाच्या भेटीला येतो. नैऋत्य आफ्रिकेच्या अटलांटिक तटाला लागून असलेल्या या कोरड्या, वालुकामय प्रदेशाला 'नामीब वाळवंट' असे म्हटले जाते