मनुष्यबळाचा 'संसाधन' म्हणून विकास करण्यासाठी मनुष्यबळाचा ज्ञानाचा स्तर वाढविणे गरजेचे असते. हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी शिक्षण व कौशल्ये मिळविणे महत्त्वाचे ठरते. म्हणून शिक्षण ही मनुष्यबळ विकासासाठी अत्यावश्यक बाब आहे. शिक्षणामुळे लोकसंख्येच्या अंगी विविध प्रकारची कामे करण्यासाठीची कौशल्य निर्माण होतात.