मानसशास्त्रीय गुणाचे मापन करण्यासाठी वापरली जाते. हे मापन करताना, चाचणी ही केवळ त्याच गुणाचे १००% मापन करतेच असे नाही. जो गुण मोजायचा आहे त्याचे मानसशास्त्रीय चाचणी किती प्रमाणामध्ये मापन करते हे यथार्थता दर्शविते. चाचणीची गुण मापन करण्याची क्षमता जितकी अधिक तितकी तिची यथार्थता अधिक असते.