सांगलीची हळद व येथील हळद-बाजार पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. उसाचे पीकदेखील जिल्ह्यात मोठया प्रमाणावर घेतले जाते. अलीकडील काळात सांगली जिल्हा द्राक्षोत्पादनासाठी प्रसिद्धीस आला असून त्यांतल्यात्यांत तासगाव व मिरज तालुके द्राक्ष उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहेत. द्राक्षापासून बेदाणे तयार करण्याचे उद्योग वाढत आहेत.