मूळ धातूंना म्हणजेच सिद्ध शब्दांना प्रत्यय किंवा उपसर्ग लागल्यानंतर जे शब्द तयार होतात त्यांना 'साधित शब्द' असे म्हणतात. शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना 'उपसर्ग घटित शब्द' असे म्हणतात.