मृद व जलसंधारण म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अविरतपणे कृषी उत्पादन मिळावे म्हणून मृद संधारणाचा मूलभूत कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे. जमिनीमधून प्राप्त होणाऱ्या साधन संपत्तीमध्ये त्यामुळे कायमस्वरुपी सुधारणा होते व जमिनीमधील आर्द्रताही दिर्घकाळपर्यंत टिकाव धरु शकते. राज्याच्या कृषी उत्पादनापैकी 80 ते 85 टक्के उत्पादन पर्जन्याश्रयी क्षेत्रातील असते.