राष्ट्रपतींची पात्रता :
कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीची पात्रता देण्यात आलेली आहे.

तो भारताचा नागरिक असावा.
वयाची पस्तीस वर्षे पूर्ण केलेली असावीत
तो लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा.
केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारित कोणतेही लाभाचे पद धारण करणारा नसावा.


राज्यपाल पदासाठी पात्रता

कलम 157 मध्ये राज्यपाल पदासाठी पात्रता पुढीलप्रमाणे
१) तो भारताचा नागरिक असावा आणि
२) त्यांनी वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावी.