जर राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ पहिल्या कारणामुळे झालेली असेल तर ही वाढ खऱ्या वृद्धीचे सूचक असते. मात्र केवळ किंमत वाढीमुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढत असेल तर ती वाढ आभासी असते. म्हणून किंमत पातळीतील बदलाचा प्रभाव घालवून टाकण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप स्थिर किमतींना केले जाते.