मराठीत विपुल म्हणावी अशी ललित साहित्याची निर्मितीही होत नाही. निबंधापासून ते गुजगोष्टी, लघुनिबंध, ललितनिबंध. ललितगद्य ते मुक्तगद्य ह्या नावानी या लेखनाचा वेगवेगळ्या काळात निर्देश केला गेला आहे. आठवणी, व्यक्तिचित्रणपर, प्रवासकथन व आत्मपर स्वरूपातून तो आविष्कृत झालेला आहे