लोकशाहीचा भाग म्हणजे काय?
✅ Updated recently
रातिनिधिक लोकशाहीचे संसदीय व अध्यक्षीय लोकशाही असे सांप्रत कार्यवाहीत असलेले दोन प्रमुख प्रकार आढळतात. संसदीय लोकशाहीमध्ये मंत्रिमंडळ आणि संसद परस्परांवर अवलंबून असतात आणि मंत्रिमंडळ हे संसदेला जबाबदार असते. बहुमतातील पक्षाचा नेता हा पंतप्रधान असतो. भारतासह ग्रेट ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलियात ही पद्धत रूढ आहे. अध्यक्षीय शासनपद्धतीत मंत्रिमंडळ संसदेपासून अलिप्त असतं आणि अध्यक्षाची जनतेकडून सरळ निवड होते. ही पद्धत प्रामुख्याने अमेरिकेत आढळते. थोड्याफार फरकाने फ्रान्स, श्रीलंका इ. देशांतूनही ती प्रचारात आहे.