मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ७ व सभा नियम १९५९ प्रमाणे ग्रामपंचायतीला ग्रामसभा घ्याव्या लागतात.
ग्रामसभांच्या संदर्भात बैठक नियम १९५९ मध्ये नमूद केल्याप्रमाणे किमान चार ग्रामसभा घेणे आवश्यक आहे.
मात्र कलम ७ (१) मधील तरतुदीनुसार दोन ग्रामसभांमधील अंतर ४ महिन्यांपेक्षा अधिक असता कामा नये.
याशिवाय आवश्यकतेनुसार चारपेक्षा जादा ग्रामसभा आयोजित करण्याचा अधिकार सरपंच व ग्रामसेवकांना आहे.