वाऱ्याच्या दाबात वातावरणाचा दाब येतोच. निव्वळ वातावरणाचा दाब एका नळीतून तरंडाच्या वरच्या भागावर पडेल अशी व्यवस्था केलेली असते. त्यामुळे निव्वळ वाऱ्याच्या दाबामुळे तरंड वर-खाली सरकतो. वारा वाढला म्हणजे दाब वाढून तरंड वर जातो.