विजयवाडा कोणत्या राज्यात आहे?
✅ Updated recently
विजयवाडा हे भारत देशाच्या आंध्र प्रदेश राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (विशाखापट्टणम खालोखाल) व कृष्णा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. विजयवाडा शहर आंध्र प्रदेशाच्या मध्य भागात कृष्णा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १.६५ लाख होती.