वैज्ञानिक संशोधन आणि उदाहरण म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शेजारच्या घरातील मूल रडले, तरी आपणास त्याचे कारण हवे असते व 'त्याला चॉकलेट हवे होते, पण त्याचे दात खराब असल्याने ते दिले नाही', हे समजले की आपण समाधान पावतो. हे एक संशोधनच आहे. पण सृष्टीतील, मानवी व्यापारापासून स्वतंत्र अशा, घडामोडींचा खुलासा देणारे जे संशोधन असते, त्याला स्थूलमानाने वैज्ञानिक संशोधन असे म्हणतात.