प्राचीन ग्रीक वैद्यकशास्त्रानुसार माणसाची व्यक्तिमत्त्वे उत्साही, निरुत्साही, नेभळट व संतापी अशा चार प्रकारची असतात. हे चार प्रकार मानवी देहातील रक्त, कफ, कृष्णपित्त आणि पीतपित्त या चार प्रधान रसायनांच्या कमीअधिक प्रमाणामुळे घडून येतात.