अशा वेळी शहाजीराजांना पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. त्यांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. हा किल्ला जिजाबाईंसाठी सुरक्षित होता. कारण किल्ल्याच्या चारी बाजूंना उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते.