ज्यांची लवचिकता जास्त असते, ते सहजपणे एखादी खाली पडलेली वस्तू उचलू शकतात, याउलट ज्यांचे स्नायू आखडलेले असतात त्यांना ही सोपी वाटणारी गोष्टसुद्धा खूपच अवघड जाते. लवचिकता नसेल, तर शारीरिक हालचालींवर मर्यादा येते. त्यामुळे अनेक आवडीच्या गोष्टी करायला आपण मुकू शकतो.