जुन्या काळी पाटील हा जणू गावचा राजाच असे. महाराष्ट्रात प्रदेशपरत्वे त्यास भिन्न नावे आढळतात. पूर्वीच्या कोल्हापूर−सांगली संस्थानांत त्याला 'चौधरी कामगावुंड' असेही म्हणत; तर कोकणात 'चौगुला' आणि इतरत्र पाटील म्हणतात. जातपाटील, सरपाटील, जडेपाटील असेही भेद आहेत.