ते ताठ बांधेसूद शरीरयष्टीचे, चपळ आहेत, बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसतं, त्यांची नजर भेदक आहे आणि त्यांच्यासोबतच्या लोकांपेक्षा ते वर्णानं गोरे दिसतात. ' राजांचे समकालीन असलेल्या आणि त्यांना भेटलेल्या व्यक्तींनी तसंच शिवभारतचे रचनाकार कविंद्र परमानंद अशा कवींनी राजांचं वर्णन केलं आहे