शिवाजी महाराजांच्या मृत्यूविषयी काही तर्क-वितर्क इतिहासकारांनी मांडले आहेत. महाराजांवर विषप्रयोग झाला, अशी अफवाही पसरली होती. बेंद्रे लिहितात: 'सोयराबाईने विष घालून शिवाजीस मारले अशी कंडी उठली होती हे डच बातमीवरूनही सिद्ध आहे. परंतु या कंडीत फारसे तथ्य असेल असे वाटत नाही.