शुद्ध लेखन कसे लिहावे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपान्त्य (म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा) इकार किंवा उकार ऱ्हस्व लिहावा. उदाहरणार्थ: किडा, विळी, पिसू, इथे, निघो, फुगा, खुनी, सुरू, कुठे, उठो. मात्र तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही. तत्सम शब्दातील उपान्त्य इकार किंवा उकार मुळाप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहावेत.