डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय विचार म्हणजे स्वराज्य, राष्ट्रवाद, लोकशाही, मूलभूत हक्क, अल्पसंख्यकाचे हितरक्षण, समाजवाद, साम्यवाद, बौद्ध धर्म इत्यादी संबंधीची विचार होते. डॉ. आंबेडकरांनी भारतातील विविध राजकीय प्रश्नासंबंधी आणि राजकीय तत्त्वज्ञानासंबंधीची मते आपल्या अनेक लेखातून, पुस्तकातून आणि भाषणांतून मांडली आहेत. तेच बाबासाहेबांचे राजकीय विचार आहेत. डॉ. आंबेडकरांचे काही राजकीय विचार हे त्यांनी घटना परिषदेच्या अधिवेशात केलेल्या भाषणातूनही व्यक्त झालेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारांचा तत्कालीन राजकारणावर तसेच स्वातंत्र्याच्या राजकारणावर प्रभाव पडला आहे.