समाजशास्त्र सर्व प्रकारच्या सामाजिक संबंधांचा अभ्यास करते म्हणून त्यास सामाजिक शास्त्र असे म्हटले जाते. समाज व सामाजिक संबंधाचा अभ्यास करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते तिला समाजशास्त्राची वैज्ञानिक पद्धत असे म्हटले जाते.