समाजशास्त्रीय समीक्षा पद्धतीचे सिद्धांत करणारा पहिला समीक्षक कोण?

समाजशास्त्रीय समीक्षा
फ्रेंच समीक्षक,इतिहासकार आणि तत्त्वज्ञ इपॉलिस आदॉल्फ तॅन (१८२८–९३)ह्याने साहित्यकृतीची चिकित्सा करण्यासाठी वंश, परिस्थिती आणि क्षणहे तीन घटक अभ्यासिले पाहिजेत, असा विचार मांडला.

समाजशास्त्रीय समीक्षा

साहित्यिक ज्यासमाजात जन्मालाआलेला असतो, त्याचे संस्कार त्याच्यावर सातत्याने होत असतात. त्यामुळेसाहित्यिक आणि त्याचा समाज ह्यांच्यातील संबंध दुर्लक्षून चालत नाहीत.ह्या विचारातून समाजशास्त्रीय समीक्षा निर्माण झाली. फ्रेंच समीक्षक,इतिहासकार आणि तत्त्वज्ञ इपॉलिस आदॉल्फ तॅन (१८२८–९३)ह्याने साहित्यकृतीची चिकित्सा करण्यासाठी वंश, परिस्थिती आणि क्षणहे तीन घटक अभ्यासिले पाहिजेत, असा विचार मांडला. ‘वंश’ म्हणजेलेखकाचे उपजत आनुवांशिक गुण; त्याची सामाजिक-राजकीय-भौगोलिकपार्श्वभूमी म्हणजे ‘ परिस्थिती ’ आणि ज्याऐतिहासिक परिस्थितीत लेखकलिहित असतो, तिला तॅन ‘ क्षण ’ म्हणतो.