समाजातील सर्वच घटकांना या ना त्या स्वरुपाची उपयुक्त व मार्गदर्शक माहिती वृत्तपत्रे पुरवत असतात. त्यामुळेच वृत्तपत्र हा जरी व्यवसाय असला, तरी ते जनसेवेचे उपयुक्त साधनही आहे. त्याप्रमाणे ते प्रभावी व सर्वदूर पोहोचणारे संपर्कमाध्यम आहे.