वृत्तपत्रे : (न्यूज पेपर). मुख्यतः वार्ता तसेच मते, जाहिराती, रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले, ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे 'वृत्तपत्र' (न्यूज पेपर).