कलिंग युद्धाचे परिणाम
कलिंगच्या युद्धाचे अशोकाच्या विचार आणि जीवनक्रमावर दूरगामी परिणाम झाले. युद्धामध्ये मिळालेल्या विजयाचा आनंद न होता निरर्थक संघर्षाने तो दुःखी झाला. केलेल्या कृत्याचा त्याला पश्चात्ताप झाला. पश्चात्तापदग्ध अशोकाने परत कधीही युद्ध न करण्याचा निश्चय केला.