पँसिफिक महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर असून त्याने पृथ्वीचा एक तृतीयांश भाग व्यापलेला आहे. उत्तर-दक्षिण अमेरिका खंडाचा पश्चिम किनारा व आशिया व आँष्ट्रेलिया खंडाचा पुर्व किनारा यांमध्ये पँसिफिक महासागर पसरला आहे. बेरिंगचे आखात ही या महासागराची उत्तर सीमा मानली जाते.