पुसारला वेंकट सिंधू (जन्म ५ जुलै १९९५) ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. ती भारतातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानली जाते. सिंधूने ऑलिम्पिक आणि बी.डब्लू.एफ. सर्किट स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत.