६ जानेवारी २००६ रोजी सार्क सदस्य राष्ट्रांनी प्रादेशिक व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराची निर्मिती केली.
सार्कची संकल्पना बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांनी 1977 मध्ये मांडली.
सार्कची पहिली बैठक ढाका येथे झाली, १९८५ च्या सुरुवातीस ७ सदस्य राष्ट्रे होती. भारत , पाकिस्तान , बांगलादेश, नेपाळ , मालदीव , श्रीलंका ,भूतान ही ७ राष्ट्रे होती. नंतर अफगाणिस्तान चा समावेश १३ नोव्हेंबर २००५ रोजी झाला . त्यामुळे आता सदस्य राष्ट्रे 8 आहेत.
अफगाणिस्तान हा मध्य आशियातील देश असल्यामुळे त्याला प्रवेश देताना सार्कच्या सदस्यदेशांमध्ये खूपच वाद झाले होते. दक्षिण आशियाई देश कुणाला म्हणायचे, यावरून हा वाद निर्माण झाला होता.
सार्कमधील सर्वच देशांना विकासासाठी खूप वाव असल्याने अनेक देश निरीक्षक म्हणून या संघटनेत सहभागी झाले आहेत. धोरण आणि उद्दिष्टांची पूर्तता करण्याबाबत सार्कचा प्रभाव हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे.
सार्कच्या व्यापार व उद्योग मंडळाची स्थापना कधी करण्यात आली होती?
✅ Updated recently