साहित्य शास्त्र चे जुने नाव काय?

शास्त्र प्राचीन भारतीय साहित्यविचारात अनेक नावांनी ओळखले जात होते. 'क्रियाकल्प' हे या शास्त्राचे सर्वांत जुने नाव होते. क्रियाकल्प अथवा काव्यक्रियाकल्प म्हणजेच काव्यरचनाशास्त्र. 'काव्यलक्षण' या नावानेही हे शास्त्र ओळखले जात होते.