गतवर्षीचे प्रत्यक्ष आकडे, आता संपत आलेल्या वर्षाबद्दलचे सुधारित अंदाज ('सुधारित', कारण पक्के आकडे अजून मिळालेले नसतात) आणि तिसरा भाग म्हणजे येत्या वर्षीच्या अंदाजाचे आकडे. भारतामध्ये अर्थसंकल्प तयार करताना तो दोन विभागांत मांडतात. चालू किंवा नित्याच्या आयव्ययांचा एक विभाग. याला 'राजस्व अर्थसंकल्प' म्हणतात.