विमान उद्योग : विमानांचा अभिकल्प (आराखडा) तयार करणे, त्यांची बांधणी (विकास) व उत्पादन करणे, तसेच त्यांचा उपयोग करणे म्हणजे ती चालविणे, त्यांची देखभाल करणे आणि त्यांची उड्डाणे भरवशाची व सुरक्षित होतील हे पाहणे इ. कामांशी निगडित असलेल्या उद्योगाला विमान उद्योग म्हणतात.