म्हणूनच मानवी जीवनात स्वच्छ व शुद्ध पाण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. जलजन्य आजार व त्याला प्रतिबंध करण्यासाठी पाणी गुणवत्तेबाबत माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पाणी गुणवत्ता म्हणजे पाण्यातील भौतिक, जैविक व रासायनिक घटकांची तपासणी करून त्याची योग्यता पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगधंद्यासाठी ठरविणे होय.