स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव काय?
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती ? असे तर विचारले तर कुणीही रायगड असेच सांगेल. परंतु, रायगडापूर्वी पुण्याजवळ असलेल्या राजगड या प्राचिन किल्ल्याने तब्बल 26 वर्षे स्वराज्याच्या राजधानीचा मान मिरवला.
हा किल्ला होता स्वराज्याची पहिली राजधानी
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती ? असे तर विचारले तर कुणीही रायगड असेच सांगेल. परंतु, रायगडापूर्वी पुण्याजवळ असलेल्या राजगड या प्राचिन किल्ल्याने तब्बल 26 वर्षे स्वराज्याच्या राजधानीचा मान मिरवला.
नेमका कुठे आहे राजगड ?
> पुण्याच्या नैऋत्येला 48 किमी अंतरावर अन् भोरच्या बायव्येला 24 किमी अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे.
> याच डोंगरावर मोठ्या थाटात राजगड उभा आहे.
> महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या तुलतेन या किल्ल्याचा बालेकिल्ला सर्वात उंच आहे.
> त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 1394 मीटर आहे.
शिवाजी महाराजांनी तोरणाऐवजी राजगडाला का केले राजधानी
> शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याजी मुर्हुतमेढ रोवली.
> मावळभागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते.
> तोरणाचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता.
> त्यामानाने राजगड दुर्गम असून, त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे.
> शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली.
> राजगडाला तीन माच्या व बालेकिल्ला आहे.
2 हजार वर्षांपूर्वी बांधला राजगड
> राजगड किल्ला साधारण 2 हजार वर्षांपूर्वीचा आहे.
> गौतमीपुत्र सातकर्णी याने मुरुंबदेवा डोंगराला किल्ल्याचे स्वरुप दिले.
> मराठेशाहीची 26 वर्षे राजधानी याव्यतिरिक्त सदर किल्ल्यावर राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्यात.
> राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकिय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदुस्वराज्याची ग्वाही देत उभा आहे.
तब्बल 125 वर्षे राहिला अजिंक्य
> राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरंबदेव हा किल्ला बहमनी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जात असे अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते.
> इसवी सन 1490 च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने वालेघाट आणि तळकोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला आणि याच वेळी त्याने मुरूंबदेव हा किल्ला हस्तगत केला.
> मुरुमदेवाचे गडकरी बिनाशर्त शरण आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयास करावे लागले नाही.
> पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर 125 वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही.
> इसवी सन 1625 च्या सुमारास मुरूमदेव किल्ला निजामशाही कडून आदिलशही कडे आला.
> निजामशहाच्या वतीने बाजी हैबतराव शिलीमकर व त्याचे वडीलरुद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहत होते.
> मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबरावाने मुरुमदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबतखामाकडे दिला.
> 1630 च्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला.
> सन1646 ते 1647 च्या सुमारास शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबत हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याला राजधानीचा दर्जा दिला.
> शिवचरित्र साहित्य खंडाच्या दहाव्या खंडात प्रसिद्ध झालले एक वृत्त सांगते की, 'शिवाजीने शहामृग नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली.'
> सभासद बखर म्हणतो, 'मुराबाद म्हणोन डोंगर होता त्यास वसविले त्याचे नाव राजगड म्हणोन ठेवले. त्या गडाच्या चार माच्या वसविल्या सभासदाने बालेकिल्ल्याला सुद्धा एक माची म्हणून गणली आहे.'
स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव काय?
✅ Updated recently