हिंदी महासागर व त्यालगतचे काही देश खनिज तेल उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या खनिज तेलाची वाहतूक व व्यापार या महासागरातून चालतो. येथील तेल उत्पादक देश या महासागरी मार्गानेच यूरोप, उत्तर अमेरिका व पूर्व आशियाई देशांकडे खनिज तेल पाठवितात