विजयालक्ष्मी पंडित
1953 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सामान्य सभेच्या (68 वे सत्र) पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.
आमसभेची प्रमुख कार्ये :
आमसभा सुरक्षा समितीच्या अस्थायी सदस्यांची आणि सामाजिक आर्थिक परिषद (ECOSOC) तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या प्रतिनिधींची निवड करते. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवाचीही निवड करते.
संयुक्त राष्ट्रांचे आर्थिक अंदाजपत्रक पारित करायचे काम आमसभा करते. महासभेने घालून दिलेल्या चौकटीमध्ये महासचिव महासभेचा कर्मचारीवर्ग नेमतात.
स्थायी सदस्यांनी लघुसभा नावाची एक अंतरिम समिती स्थापन केली आहे. महासभेच्या सत्रस्थगितीच्या काळात ही लघुसभा कार्य करत असते. त्याच वेळी सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यांमध्ये शांतता आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर मतैक्य न झाल्यास, २४ तासांत महासभेचे विशेष अधिवेशन बोलावले जाऊ शकते. या अधिवेशनात सामूहिक सैनिकी कारवाईचे निर्णय घेतले जाऊ शकतात.
सुरक्षा परिषदेच्या १० अस्थायी सदस्यांची निवड, सामाजिक आणि आर्थिक परिषदेच्या ५४ सदस्यांची निवड तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या सदस्यांची निवड या बाबतीत महासभेचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अस्थायी सदस्यांची निवड आमसभा आणि सुरक्षा परिषद करते.
महासभेच्या अन्य कर्तव्यांमध्ये अधिकारीवर्गाची निवड आणि वार्षिक अर्थसंकल्पाला मंजुरी देणे यांचा समावेश होतो.
१० संयुक्त राष्ट्र संघातील आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या?
✅ Updated recently