१४ मुंबई द्वैभाषिक मराठी व गुजराती राज्याची निर्मिती कधी झाली होती?

१९५५ नंतर बॉम्बे इलाख्याची फाळणी करून महाराष्ट्र व गुजरात राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी होत होती. परंतु
काहींच्या मते मुंबईला केंद्रशासित करावी असे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने यास प्रखर विरोध केला व मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. त्यावेळेस देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी विरोध केला, तरीही मराठी आणि इतर सहकाऱ्यांनी त्यांचा विरोधाला न जुमानता मुंबई ही महाराष्ट्राची केली. त्यासाठी झालेल्या चळवळीदरम्यान केलेल्या गोळीबारात १०५ लोक मरण पावले. या १०५ हुतात्म्यांच्या आहुतीनंतर १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्या राज्याची राजधानी मुंबईच राहिली. त्यांच्याच स्मरणार्थ फ्लोरा फाऊंटन येथे कारंज्याच्याच शेजारी एक स्तंभ उभारून त्या चौकाचे नाव हुतात्मा चौक केले.