प्रश्नांची यादी

भाषा म्हणजे काय मानवी जीवनात भाषेचे स्थान कोणते ते सांगा? open

भाषा ही संदेशवहनाचे साधन आणि माध्यम असते, हे खरेच आहे; पण भाषेचे मानवी जीवनातील स्थान एवढेच असत नाही, त्यापेक्षा ते मोठे आणि सर्वव्यापी असते. भाषा हे माणसाच्या अस्तित्वाचेच अभिन्न आणि अविभाज्य अंग असते. भाषेने माणसाला आतून आणि बाहेरून व्यापून टाकलेले असते. वापरा किंवा न वापरा, भाषा कायम आपल्यासोबत असते.

पूर्ण वाचा →

आपण मराठी दिवस का साजरा करतो? open

मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन हा १ मे रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, आणि मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आल्यामुळे हा दिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा केला जातो.

पूर्ण वाचा →

आपल्या राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये कोणती भाषा समाविष्ट नाही? open

इंग्रजी ही अनुसूचित भाषा नाही. भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये भारतीय प्रजासत्ताकच्या अधिकृत भाषांची यादी आहे.

पूर्ण वाचा →

भारतीय संविधानाने किती भाषांना प्रादेशिक भाषेचा दर्जा दिलेला आहे? open

सध्या भारतीय घटनेनुसार देशात बोलल्या जाणाऱ्या २२ प्रादेशिक भाषांना शासकीय राजभाषेचा दर्जा दिला आहे. यांत आसामी, उर्दू, ओरिया, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराती, डोगरी, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मराठी, मल्याळम, मैतेई, मैथिली, संथाली, संस्कृत, सिंधी, आणि हिंदी, यांचा समावेश होतो.

पूर्ण वाचा →

मराठी भाषेच्या अधिक विकासासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या संस्था स्थापन केल्या आहेत? open

राज्य मराठी विकास संस्था (लघुरूप: रामविसं) ही मराठी भाषेच्या विकासाकरता प्रयत्‍न करणारी महाराष्ट्र शासनपुरस्कृत संस्था आहे. "मराठीचा विकास : महाराष्ट्राचा विकास" हे संस्थेचे बोधवाक्य आहे.

पूर्ण वाचा →

पुण्यात कोणती भाषा बोलली जाते? open

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. पुण्यात बोलली जाणारी मराठी ही भाषेची प्रमाणित आवृत्ती मानली जाते

पूर्ण वाचा →

मराठी भाषा का महत्त्वाची आहे? open

मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठीचे वय सुमारे २४०० वर्ष आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे.

पूर्ण वाचा →