प्रश्नांची यादी

भीमा ही गोदावरीची उपनदी आहे का? open

गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. भीमा नदीचा उगम सह्याद्री पर्वत रांगात महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी झाला आहे. भीमा नदी ही कृष्णेची उपनदी आहे.

पूर्ण वाचा →

सिंधूची कोणती उपनदी थेट जोडते? open

सिंधू नदीला थेट जोडणारी नदी म्हणजे चिनाब नदी . हिमाचल प्रदेशातील तांडी येथे चंद्रा आणि भागा या दोन नद्यांच्या संगमाने चिनाब नदीची निर्मिती झाली आहे.

पूर्ण वाचा →

भीमा नदी कोठे सुरू होते आणि कोठे संपते? open

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात. ती महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ८६० कि. मी. आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते.

पूर्ण वाचा →

चंद्रभागा का प्रसिद्ध आहे? open

सर्व तीर्थांना पवित्र करणारे तीर्थ कोणते असेल तर ती चंद्रभागा. नुसती चंद्रभागा नदी पहिली तरी भूतलावरील सर्व तीर्थांचे स्नान केल्याचे पुण्य मिळते. सर्व दोष घालवण्याची शक्ती चंद्रभागा दर्शनात आहे. यामुळे सर्वोत्कृष्ट क्षेत्र आणि तीर्थ म्हणजे चंद्रभागा आहे.

पूर्ण वाचा →

पुणे तालुक्यातून कोणती मुख्य नदी वाहते? open

सह्याद्रीच्या पर्वतात उगवणार्‍या मुळा आणि मुठा नद्या पुण्यातून वाहतात. या दोन्ही नद्या पुढे एकत्र येतात आणि भीमा नदीला जाऊन मिळतात. या तीनही नद्या पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातून साधारण अंदाजे ४४ किलोमीटर प्रवास करतात. त्यापैकी २२.२ किमी मुळा नदी, १०.४ किमी मुठा नदी आणि ११.८ किमी मुळा-मुठा असा प्रवास या नद्या करतात.

पूर्ण वाचा →