प्रश्नांची यादी

इतिहास लेख म्हणजे काय? open

इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे संशोधन करून ,भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला " इतिहासलेखन " असे म्हणतात. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे. त्या माहितीची स्थल व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेणे,तसेच त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे.

पूर्ण वाचा →

लेखक कसे बनावे? open

लेखक बनण्यासाठी कोणतेही शिक्षण घेण्याची अजिबात आवश्यकता नसते. फक्त आपल्यामध्ये लिहिण्याची आवड आणि निर्मितीशीलता असावे लागते. ज्यासाठी आपण भरपुर अनुभवी लेखकांच्या पुस्तकांचे वाचन करायला हवे त्याचबरोबर नियमित लेखनाचा सराव देखील करायला हवा.

पूर्ण वाचा →

लेखक म्हणजे काय? open

एखाद्या विचारप्रधान विषयावर लिखाण करणाऱ्या किंवा कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, पटकथा इत्यादी प्रकारांतील कल्पनाप्रधान साहित्यकृती लिहिणाऱ्या व्यक्तीस लेखक असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

कथा काव्य म्हणजे काय? open

मुख्यतः कथाकथनाच्या उद्देशाने लिहिण्यात येणारे काव्य. सामान्यतः काव्याचे भावगीत किंवा भावकविता, नाट्यगीत किंवा नाट्यकाव्य व कथाकाव्य असे प्रकार केले जातात. या तीनही काव्यप्रकारांचे प्रयोजन, प्रकृती व परिणाम ही सामान्यतः भिन्नभिन्न असतात.

पूर्ण वाचा →

कथा म्हणजे काय हे सांगून कथेचे घटक स्पष्ट करा? open


म्हणजे कथाकाव्यातील कथेचा घाट कवीच्या कथाविषयक अभिज्ञतेने तसेच त्याच्या प्रतिभागुणांनी निश्चित केलेला असतो आणि या घाटाच्या अनुरोधाने कथाकाव्यातील पात्रे, त्यांच्या कृती आणि उक्ती, भावनाप्रधान किंवा विचारप्रधान स्थळे, काल्पनिक वर्णने, त्याचप्रमाणे कथेतील मध्यवर्ती नाट्य किंवा संघर्ष आणि तिचे आदी, मध्य, अंत वगैरे घटक ...

पूर्ण वाचा →

कथा या साहित्य प्रकाराचे स्वरूप कसे असते? open

कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात. स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदन शैलीही असते.

पूर्ण वाचा →