प्रश्नांची यादी

समुद्रातील बेटे म्हणजे काय? open

बेट अथवा द्वीप हा पृथ्वीवरील जमीनीचा असा भाग आहे जो चारही दिशांनी पाण्याने वेढला गेला आहे. बेट हे नदी, सरोवर, समुद्र इत्यादी कोणत्याही पाण्याच्या अंगामध्ये असू शकते व ते नैसर्गिक अथवा मानवनिर्मित असते. भौगोलिक रित्या समान व जवळजवळ असणाऱ्या बेटांच्या गटाला द्वीपसमूह असे म्हटले जाते.

पूर्ण वाचा →

सागरी बेटे म्हणजे काय? open

कोणत्याही भूखंडापासून दूर अशा सागरी भागात सागरपृष्ठावर डोकावणाऱ्या भूभागाला सागरी बेट असे म्हणतात. अशा बेटांचे जवळच्या भूप्रदेशाशी साम्य आढळत नाही. असेलच तर तो केवळ योगायोग म्हणावा लागेल. सागरी बेटे ही ज्वालामुखी, भूकवचातील हालचाली वा प्रवाळे यांमुळे निर्माण झालेली असतात.

पूर्ण वाचा →

मुंबई शहराची स्थापना कधी झाली? open

१८ व्या शतकाच्या मध्य काळात ब्रिटिशांनी कुलाबा, लहान कुलाबा, माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या सात बेटांचे एकत्रीकरण करून मुंबई बनवली. १९ व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २० व्या शतकामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला.

पूर्ण वाचा →

मुंबई हे नाव कसे पडले? open

मुंबई शहराचे नाव येथील मातृदेवता मुंबा देवी या देवतेच्या नावावरून पडले आहे, पूर्वीचे कोळी लोक तीचे उपासक होते. मुंबई शहर जिल्हा हे भारताच्या पश्चिम किना-यावर १८° ५२' आणि १९° ०४' उत्तर अक्षांक्ष आणि ७२° ४७' आणि ७२° ५४' पूर्व रेखांशादरम्यान वसलेले आहे.

पूर्ण वाचा →

नामनिर्देशित सदस्य म्हणजे काय? open

नामनिर्देशित व्यक्ती ही त्या रकमेची फक्त विश्वस्त असते. मृत ठेवीदाराच्या वतीने बँकेकडून पैसे घेण्यासाठी नामनिर्देशित व्यक्ती असतो. त्याने हे पैसे मृताच्या योग्य वारसदाराना देणे अपेक्षित असते. नामनिर्देशित व्यक्तीचे नाव मुदत ठेवीवर छापावे कि छापू नये याचा निर्णय ठेवीदाराने घ्यायचा असतो.

पूर्ण वाचा →