प्रश्नांची यादी

कोणत्या प्रकारची शेती शाश्वत आहे? open

शाश्‍वत शेतीला सेंद्रीय शेती, नैसर्गिक शेती, पर्यावरणीय शेती असेही म्हणतात. शाश्‍वत शेतीत पर्यावरण संतुलनाला जास्त महत्त्व दिले जाते. म्हणून तिला पर्यावरणीय शेती म्हणतात.

पूर्ण वाचा →

भारतात निर्वाह शेती म्हणजे काय? open

निर्वाह शेती : शेतकरी व त्याचे कुटुंब यांच्या भरणपोषणाचे साधन म्हणून कसली जाणारी शेती. शेतमालाची विक्री करून पैसा मिळविण्याचा तिचा उद्देश नसतो. निर्वाह शेती अर्थातच केवळ अन्नपिकांच्या क्षेत्रातच शक्य आहे. कारण अन्नेतर पिके बव्हंशी विकावीच लागतात.

पूर्ण वाचा →

शाश्वत शेती म्हणजे काय? open

शाश्‍वत शेती म्हणजे जमीन, पिके, वने, पशुधन, वन्यजीव, मासे, पर्यावरण इत्यादी पुनःर्जीत करण्याजोगे स्रोतांच्या प्रतवारीचा घसारा न होऊ देता संतुलीत व्यवस्थापन करून वर्तमान व भावी पिढीसाठी अन्न, वस्त्र व निवारा यांचा पुरवठा करणे होय.

पूर्ण वाचा →

भारतात कमी उत्पादकतेची कारणे कोणती? open

भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेची कारणे- लोकसंख्येचा शेतीवरील अतिरिक्त भार, शेतीचा लहान आकार मान्सूनचा जुगार ,सिंचन सोयींची कमतरता, अपर्याप्त पतपुरवठा, उत्पादनाचे तंत्र, जमिनीची सुपीकता महागडी शेती आदाने, शेतीकडे पाहण्याचा पारंपारिक दृष्टीकोन, सदोष विपणन व्यवस्था ,शेती संशोधनाकडे दुर्लक्ष ,शेतमालाला रास्त भाव नाही , ..

पूर्ण वाचा →

कोणत्या राज्यात सर्वाधिक पिके घेतली जातात? open

उत्तरप्रदेश हे भारतातील सर्वाधिक शेती असलेल्या राज्यांतर्गत येते आणि भारतातील प्रमुख राज्यवार पीक उत्पादनात जसे की, बाजरी, तांदूळ, ऊस, अन्नधान्य आणि अन्य या अंतर्गत उत्तरप्रदेशची गणना केली जाते. पंजाब हे पृथ्वीवरील सर्वात सुपीक राज्य आहे. पंजाबमध्ये गहू, ऊस, तांदूळ, भाजीपाला आणि फळांचे चांगले उत्पादन घेतले जाते.

पूर्ण वाचा →

सधन निर्वाह शेतीची वैशिष्ट्ये काय आहेत? open

निर्वाह शेतीच्या व्याख्येचे घटक दोन : ( १ ) ती अन्नपिकांची शेती असते. (२)तिच्यात होणारे अन्नपिकांचे उत्पादन शेतकऱ्यांच्या कुटुंबाला साधारणपणे पुरेसे एवढेच किंवा त्याहूनही कमी असते. धारणाचे आकारमान लहान असेल, तर शेतीला निर्वाह शेतीचे स्वरूप येणे बऱ्याच वेळा अपरिहार्य ठरते.

पूर्ण वाचा →