उपयोगिता विश्लेषण म्हणजे काय?

उपयोगिता ही संकल्पना उपभोगत्याचे समाधान किंवा आनंद या अर्थाने वापरली जाते ही संकल्पना पूर्णपणे मानसिक संकल्पना आहे . उपभोक्ता जेव्हा एखादी वस्तू खरेदी करतो किंवा एखाद्या वस्तूचा उपभोग घेतो . तेव्हा त्या वस्तूपासून त्याला जे समाधान मिळते . त्याला अर्थतज्ञांनी उपयोगिता असे म्हटले आहे . 
म्हणूनच ही संकल्पना व्यक्तिनिष्ठ , वस्तुनिष्ठ , मनोनिष्ठ आहे . त्याच प्रमाणे ही संकल्पना व्यक्तिपरत्वे , कालपरत्वे , आणि स्थलपरत्वे बदलत जाते . एखाद्या व्यक्तीला त्या वस्तु बद्दल उपयोगिता वाढते उदा. तहानलेल्या माणसाला पाण्याची गरज आहे . याचा अर्थ असा की पाणी पिल्यामुळे त्याची तहान ही गरज पूर्ण होणार आहे . म्हणूनच त्याच्या दृृष्टीने पाण्यात उपयोगिता आहे .

• उपयोगिता विश्लेषणाची ग्रहिते :-

उपयोगिता मोजता येते .
उपयोगितांची बेरिज करणे शक्य आहे .
प्रत्येक वस्तूची उपयोगिता स्वतंत्र असते .
पैसा हा उपयोगिता मोजण्याच मापदंड आहे .
पैसाची सिमांत उपयोगिता स्थिर असते .
उपभोगता विवेकी आहे .


• उपयोगितेच्या संकल्पना :- 
1] एकूण उपयोगिता :- [ Total Utility (T.U) ] 
" विशिष्ट वेळी विशिष्ट वस्तूच्या विविध नगाच्या उपयोगामुळे मिळणाऱ्या उपयोगितेची एकूण बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. "
" एकूण उपयोगिता म्हणजे सर्व नागांच्या उपयोगितेची बेरीज होय . "

2] सिमांत उपयोगिता :- [ Marginal Utility (M.U) ]
" एखाद्या वस्तूच्या सीमांत म्हणजेच शेवटच्या नागाच्या सेवनापासून एकूण उपयोगितेत जी भर पडते , तिला सीमांत उपयोगिता असे म्हणतात ."