मक्तेदारीची कारणे व स्वरूप : मक्तेदारी बाजारात अनेक ग्राहक असून एकच विक्रेता असतो.पूर्ण स्पर्धेच्या विरुद्ध टोकाला केवळ एकच विक्रेता असलेली मक्तेदारी बाजारपेठ असते. या बाजारपेठेत इतर विक्रेत्यांचा प्रवेश होणे शक्य नसते. आपल्या विक्रीचे परिमाण हे आपण आकारणार असलेल्या किंमतीवर अवलंबून राहील, हे मक्तेदाराने गृहीतच धरलेले असते.