ज्या भाषेत भाषांतर करायचे आहे तिला काय म्हणतात?
अनुवादप्रक्रिया अनुवाद प्रक्रियेत ज्या भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेत आणायचा असतो, त्या भाषेला मूळ भाषा किंवा उगम भाषा अथवा स्रोत भाषा म्हणतात आणि ज्या भाषेत तो मजकूर आणला जातो त्या भाषेला लक्ष्य भाषा म्हणतात. चांगल्या अनुवादासाठी अनुवादकाला दोन्ही भाषांची उत्तम जाण असावी लागते.