फक्त माणूसच कशाला, सर्वच सजीवांना संवादाची गरज असते. माणसाची जशी भाषा आहे तशीच सर्वांची आपापली भाषा असते ज्यातून ते परस्परांशी संवाद साधतात. जगाशी सुद्धा त्यांना संवाद साधावा लागतोच. नाग फुस्स करून भवतालच्या आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो,माझ्या वाट्याला जाऊ नका, हा इशारा देतो.